Thursday, September 16, 2010

मुंबई

मुंबई

महाराष्ट्र • भारत
*प्रमाणवेळ :- IST (यूटीसी+५:३०)

*क्षेत्रफळ :- ६०३ km² (२३३ sq mi)

* उंची  :-  ८ m (२६ ft)
*जिल्हा :- मुंबई शहरमुंबई उपनगर
*लोकसंख्या :- १३,३००,००० (१ ला) (२००६)

*घनता :-• २१,८८०/km² (५६,६६९/sq mi)

* मेट्रो :-• १९,७००,००० (१ ला) (२००६)
*महापौर :-  सौ.श्रध्दा जाधव
आयुक्त :-   स्वाधिन क्षत्रिय


*कोड  पिन कोड :-• ४०० xxx
*दूरध्वनी :- +022

* UN/LOCODE :- INBOM

* आरटीओ कोड :- MH-01—03
मुंबई (IPA: /'mumbəi/ उच्चार ऎका) ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्‍यावर वसले आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वात मोठे शहर आहे. मुंबई शहराला नैसर्गिक बंदर लाभले असून ते भारतातील ५०% प्रवासी व मालवाहतुकीकरता वापरले जाते.

मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. रिझर्व बँक, मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार या महत्त्वाच्या आर्थिक संस्था येथे स्थित आहेत. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने देशाच्या इतर भागातून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत येतात. मुंबई हे हिंदी चित्रपट उद्योगाचे केंद्र आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईच्या ह्द्दीतच आहे व असा योग खूप कमी शहराच्या बाबतीत आहे.
* मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरून पडले आहे. पोर्तुगीजांनी बोम बाहीया व इंग्रजांनी बाँबे असे नामकरण केले होते. १९९५ मध्ये या शहराचे नाव पुन्हा मुंबई करण्यात आले.