Tuesday, August 10, 2010

ए.आर. रहमान

पूर्ण नाव अल्लाह रक्खा रहमान

टोपणनाव ए. आर. रहमान , इसै पुयल [இசைப் புயல்](संगीतातील चक्रीवादळ)
जन्म जानेवारी ६, १९६७
मद्रासतमिळनाडू
सुरवात १९९२
संगीत प्रकार संगीत दिग्दर्शन, रचना, पार्श्वगायन
कारकीर्दीचा काळ १९८५ पासुन
पुरस्कार ४ राष्ट्रीय पुरस्कार, ऑस्कर पुरस्कार, गोल्डन ग्लोब पुरस्कार, बाफ्टा पुरस्कार
संकेतस्थळ ए. आर. रहमान.com
अल्लाह रक्खा रहमान (तामिळ: ஏ.ஆர்.ரகுமான் (ए.आर.रगुमान) ) जन्म नाव :ए.एस. दिलीपकुमार A. S. Dileep Kumar (திலீப் குமார்) हे भारतातील व जगातील एक लोकप्रिय संगीतकार आहेत. १९९२ सालापासुन त्यांनी आजवर अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये मंत्रमुग्ध करुन टाकणारे संगीत देउन जगभरातील चाहत्यांची मने जिंकली आहेत. रोजा, बॉम्बे, रंगीला, दिल से, लगान, रंग दे बसंती हे त्यांचे काही उल्लेखनीय चित्रपट आहेत. २००८ साली प्रदर्शित झालेल्या स्लमडॉग मिलियोनेर ह्या इंग्रजी चित्रपटाच्या संगीतासाठी ए. आर. रहमानांना ऑस्कर, गोल्डन ग्लोब व बाफ्टा पुरस्कार मिळाले आहेत.