पूर्ण नाव अभिजीत सावंत
टोपणनाव इंडियन आयडॉल.
जन्म ७ ऑक्टोबर, १९८१
मुंबई,महाराष्ट्र
संगीत प्रकार कंठसंगीत गायन,पॉप संगीत.
कार्यक्षेत्र पार्श्वगायन, सुगम संगीत
कारकीर्दीचा काळ २००४-५ पासून
पुरस्कार इंडियन आयडॉल.
अभिजीत सावंत (७ ऑक्टोबर, १९८१; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हा एक मराठी, भारतीय पार्श्वगायक आहे. तो इंडियन आयडॉल ह्या गायन स्पर्धेचा (पहिला मोसम) विजेता आहे, अशी एक मालिका जीने गायन स्पर्धेचे नवे उच्चांक मोडले , ही मालिका सर्वप्रथम युनायटेड किंगडम मध्ये पॉप आयडॉल ह्या नावाने सुरु झाली.अभिजीत त्याआधी क्लिनीक ऑल क्लिअर जो जीता वही सुपरस्टार ह्या स्पर्धेचा उपविजेता देखील होता, तसेच तो एशियन आयडॉल ह्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिसर्या क्रमांकाचा विजेता ठरला.