Monday, August 9, 2010

लता मंगेशकर

पूर्ण नाव लता मंगेशकर

टोपणनाव गानकोकिळा, लता-दीदी, आनंदघन
जन्म सप्टेंबर २८, १९२९
इंदोर, मध्य प्रदेश (ब्रिटीश काळातील मध्य भारत एजन्सी)
संगीत प्रकार कंठसंगीत गायन,
कार्यक्षेत्र पार्श्वगायन, सुगम संगीत
पुरस्कार भारतरत्न
वडील मास्टर दिनानाथ मंगेशकर
आई माई मंगेशकर
पती अविवाहित
प्रसिध्द नातेवाईक आशा भोसले
उषा मंगेशकर
हृदयनाथ मंगेशकर
मीना मंगेशकर

लता मंगेशकर (जन्म: सप्टेंबर २८, १९२९) भारताच्या महान गायिका आहेत. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. संगीत-विश्वात त्यांना 'लता-दीदी' म्हणून ओळखले जाते. लता-दीदीच्या कारकीर्दीची सुरूवात १९४२ मध्ये सुरू झाली आणी सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, इतर वीस वर प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये (प्रामुख्याने मराठी) गायन केले आहे. लता-दीदींचा परिवार संगीतासाठी प्रसिद्ध असून, त्यांच्या भावंडांमध्ये सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणी ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर समाविष्ट आहेत. लता-दीदींचे वडील मास्टर दिनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.
भारताचा सर्वोच्च पुरस्कार 'भारतरत्न' प्राप्त होणार्‍या गायक-गायिकांमध्ये लता-दीदींचे नाव दुसर्‍या क्रमांकावर आहे.
लता-दीदींचे नाव 'गिनेस बुक ऑफ़ वर्ल्ड रेकॉर्ड्स' मध्ये १९७४ ते १९९१ च्या कालावधीत सर्वात जास्त ध्वनिमुद्रणांच्या (रेकॉर्डिंग्स) उच्चांकासाठी नमूद आहे.