पुर्ण नाव विश्वनाथन आनंद
देश भारत
जन्म डिसेंबर ११, १९६९ (1969-12-11) (वय ४०)
Chennai, India
पद ग्रँडमास्टर -१९८८
विश्व अजिंक्यपद २०००-२००२ (फिडे), २००७, २००८, २०१०-सद्य (अविवादीत)
फिडे गुणांकन २८००
(क्र. ३, जुलै २०१० फिडे गुणांकन यादी)
सर्वोच्च गुणांकन २८०३ (एप्रिल २००६)
विश्वनाथन आनंद हा भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे व तो सध्याचा जग्गजेता आहे. FIDE फेडरेशन इंटरनॅशनल डेस इचेसच्या ऑक्टोबर २००७ च्या क्रमवारीनुसार तो जगातील अव्वल क्रमांकाचा खेळाडू आहे. मेक्सिको शहरात झालेली जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकून तो २९ सप्टेंबर २००७ रोजी जग्गजेता झाला. आनंदने ह्या स्पर्धेत १४ पैकी ९ गुण मिळविले. तो ह्या स्पर्धेत एकही सामना हरला नाही. त्याने इतर स्पर्धकांपेक्षा एक पूर्ण गुण अधिक मिळवला.
२००८ मधे आनंदने रशियाच्या वल्दिमिर् क्राम्निकला ला ६.५ - ४.५ असे हरवुन जग्गजेतेपद आपल्यापशिच ठेवले.
आणि २०१० मध्ये आनंदने बुल्गेरियाच्या टोपोलोवला ६.५ - ५.५ असे हरवुन पुन्हा एकदा जग्गजेतेपद आपल्यापशिच ठेवले.