Monday, August 2, 2010
माधुरी श्रीराम नेने
पूर्ण नाव माधुरी श्रीराम नेने
माधुरी शंकर दीक्षित(पूर्वाश्रमीचे)
जन्म मे १५, १९६७
मुंबई, महाराष्ट्र, भारत
कार्यक्षेत्र चित्रपट
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा हिंदी
प्रमुख चित्रपट दिल, बेटा, हम आपके है कौन?, दिल तो पागल है, देवदास
पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार (१९९०, १९९२, १९९४, १९९७, २००२)
पती डॉ. श्रीराम माधव नेने
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
माधुरी दीक्षित (१५ मे, १९६७ - हयात) ही हिंदी चित्रपटसृष्टीतील मराठी अभिनेत्री आहे. माधुरीने १९८० च्या दशकाची शेवटची काही वर्षे आणि १९९० च्या दशकात हिंदी चित्रपटांतील एक नावाजलेली अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून आपले स्थान पक्के केले. व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी ठरलेल्या बर्याच चित्रपटांत तिने काम केले. त्यात तिच्या अभिनयाची व नृत्यकौशल्याची खूप वाहवा झाली. २००८ मध्ये भारत सरकारतर्फे तिला भारताचा चौथा महत्त्वाचा नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आरंभीचे आयुष्य
माधुरी दीक्षित हिचा जन्म मुंबईमध्ये शंकर आणि स्नेहलता दीक्षित या मराठी दांपत्याच्या घरी झाला. माधुरीने डीव्हाईन चाईल्ड हायस्कूल शाळेमध्ये आपले प्राथमिक शिक्षण घेतले. नंतर मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतल्यावर सूक्ष्मजीवतज्ज्ञ होण्याचा तिचा मानस होता. ती तरबेज कथक नृत्यांगना आहे. तिने सुमरे ८ वर्षे नृत्याचे प्रशिक्षण घेतले होते